आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना आपल्या आरोग्याची नीट काळजी घेणे आवश्यक आहे कारण त्यांना दिवसभरात वेगवेगळे टास्क पार पाडावी लागतात. हे कामं करताना महिला आपल्या Health कडे लक्ष देत नाही आणि मग वजन वाढायला सुरुवात होते व त्यामुळे वेगवेगळ्या आजारांना face करावी लागतात.
आजच्या Topic मध्ये आपण बघणार आहोत की सोपे उपाय करून कमीत-कमी १० दिवसांत वजन कसे कमी करता येईल.
१. नियमित व्यायाम करणे: जर वजन कमी करायचंय असेल तर रोज व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायाम केल्यास शरीरातील कॅलरी कमी करण्यास आणि चरबी जलद गतीनं घटण्यासाठी मदत मिळेल. संशोधनातील माहितीनुसार, नियमित कमीत कमी ५५ मिनिटे व्यायाम करावा. व्यायामामुळे संपूर्ण शरीराची हालचाल होते. शरीर सक्रीय असल्यास अतिरिक्त चरबी जमा होत नाही. यामुळे शरीर देखील हलके होते.
२. हेल्दी नाश्ता: संशोधनानुसार सकाळचा नाश्ता हा पोटभर केल्यास आश्चर्यकारक परिणाम दिसुन आले आहेत.यामुळे दिवसभर शरीरातील कॅलरी घटण्यास मदत मिळते. पोटभर नाश्ता म्हणजे तळलेले पदार्थ नाही तर प्रोटीन युक्त आहार घ्यावा.नाश्त्यामध्ये अन्नपदार्थांव्यतिरिक्त फळांचाही समावेश करावा.
3.पाणी भरपूर पिणं: डिटॉक्स करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी पिणे. पाण्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जातात. यामुळे आपल्या शरीराची चयापचयाची क्षमता देखील वाढते. शरीर हायड्रेट राहते आणि ऊर्जाही मिळते. दिवसभरातून कमीत कमी आठ ग्लास पाणी प्यावे. गरम किंवा कोमट पाणी प्यायल्यास शरीराला सर्वाधिक फायदे मिळतील. यामुळे चरबी लवकर घटण्यास मदत मिळते.
४. आहारात फायबर चे प्रमाण वाढवावे: आपलं digestive system चांगले रहावे यासाठी जेवणात फायबर युक्त आहाराचं समावेश करणं आवश्यक आहे.फळे, आणि फळभाज्या यांचा दैनंदिन जीवनात समावेश करावा.याव्यतिरिक्त जेवणापूर्वी एखादे फळ किंवा फळाचा तुकडा खावा. यामुळे तुमचे पोट भरेल आणि तुम्हाला जास्त भूकही लागणार नाही.




